Special Report | लोकांनी मंत्रालय म्हणायचं की मदिरालय?
राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा असा प्रश्न आहे.
दरम्यान, मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.