मोठी बातमी- मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपाल कोश्यारींकडून मविआच्या 12 आमदारांची यादी रद्द

| Updated on: Sep 05, 2022 | 9:20 AM

महाविकास आघाडीने सातत्याने प्रलंबित असलेल्या या  यादीवरून नाराजी व्यक्त केली होती. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीने राज्यपालांना दिलेली यादी रद्द करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रानंतर महाविकास आघाडीच्या 12 आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. याचाच अर्थ नव्याने स्थापित झालेले शिंदे-फडणवीस सरकार आता विधान परिषदेसाठी नव्याने यादी देणार आहेत. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीने सातत्याने प्रलंबित असलेल्या या  यादीवरून नाराजी व्यक्त केली होती. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीने राज्यपालांना दिलेली यादी रद्द करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला. याचाच अर्थ या ठिकाणी आता नावे 12 आमदार नियुक्त होतील. महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची ही महत्त्वाची घडामोड आहे.

 

Published on: Sep 05, 2022 09:20 AM