Aurangabad मधील लेबर परिसरात जमावबंदी लागू, कॉलनी पाडण्याला स्थानिकांचा विरोध

Aurangabad मधील लेबर परिसरात जमावबंदी लागू, कॉलनी पाडण्याला स्थानिकांचा विरोध

| Updated on: May 10, 2022 | 3:59 PM

शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या या वसाहतीत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरही कुटुंबियांनी जागा बळकावलेली आहे तसेच त्यात भाडेकरू, पोटभाडेकरूदेखील ठेवलेले आहेत.

औरंगाबादः शहरातील जिल्हाधिकारी (Collector office) कार्यालय परिसरातील विश्वास नगर लेबर कॉलनीवरील (Labor colony) कारवाईला आता एकच दिवस शिल्लक असून नागरिकांनी शक्य तेवढं सहकार्य करावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या या वसाहतीत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरही कुटुंबियांनी जागा बळकावलेली आहे तसेच त्यात भाडेकरू, पोटभाडेकरूदेखील ठेवलेले आहेत. तसेच येथील इमारती आता जीर्णावस्थेत असून त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे त्या लवकरात लवकर पाडणे आवश्यक असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी येथील इमारती पाडून नवी योजना आखली आहे.

Published on: May 10, 2022 03:58 PM