Solapur | सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात संचारबंदी

Solapur | सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात संचारबंदी

| Updated on: Aug 13, 2021 | 10:00 AM

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. तर बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंद असणार आहेत. विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी आहे. खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरु राहणार आहे.