विधानसभा निवडणुकीत महायुती ‘इतक्या’ जागांवर थांबणार तर मविआ… लोकपोलच्या सर्व्हेनं उंचावल्या भुवया
आगामी काळात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्यापूर्वी लोकपोल संस्थेचा ओपिनियन पोल समोर आला आहे. लोकपोल संस्थेने केलेल्या सर्व्हेत थेट आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 115 जागांवरच थांबणार असल्याचा दावा लोकपोल सर्व्हेतून करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 141 ते 154 जागा मिळणार असल्याचा दावा लोकपोलच्या सर्व्हेत करण्यात आला आहे. लोकपोल संस्थेने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत दिसत आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे. तर लोकपोलच्या सर्व्हेनुसार, महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीला एकूण मतांच्या 38 ते 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच मविआला एकूण मतांच्या 41 ते 44 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, असं लोकपोलच्या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.