लोकसभा लढायची नव्हती पण…, पंकजा मुंडेंना तिकीट अन् धनंजय मुंडे बहिणीच्यामागे पाठिशी
ढोल ताश्यांचा नाद, जेसीबीतून फुलांची उधळण, बंजारा समाजाच्या पारंपारिक नृत्यावर ठेका आणि कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी...लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर अशा उत्साही आणि भावनिक वातावरणातून परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी प्रवेश केला
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ऐतिहासिक ओवाळणी देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. धनु भाऊ यांच्यामुळे परळीत आता जास्त फिरण्याची गरज नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनी अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळाले. ढोल ताश्यांचा नाद, जेसीबीतून फुलांची उधळण, बंजारा समाजाच्या पारंपारिक नृत्यावर ठेका आणि कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी…लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर अशा उत्साही आणि भावनिक वातावरणातून परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी प्रवेश केला. गोपिनाथ गडावर जात पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे या नतमस्तक झाल्यात. यावेळी त्यांच्या सोबत बीड जिल्ह्यातील पालकमंत्री आणि मोठे बंधू धनंजय मुंडे हे देखील सोबत होते. लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे बंधू-भगिनी एकत्र आलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…