मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? देवेंद्र फडणवीसांनी दिलं थेट उत्तर

मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? देवेंद्र फडणवीसांनी दिलं थेट उत्तर

| Updated on: May 17, 2024 | 1:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एकूण १९ सभा झाल्यात. खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी सोबत असताना महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी मोदींना मेहनत घ्यायची गरज का? असा सवाल टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी फडणवीस यांना केला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एकूण १९ सभा घेतल्या. यासोबत मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा मेगा रोड शो आणि जाहीर सभा देखील झाल्यात. यावरून विरोधकांनी महायुतावर टीका केली. दरम्यान, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी सोबत असताना महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी मोदींना मेहनत घ्यायची गरज का? असा सवाल टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी फडणवीस यांना केला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे सोबत होते तेव्हाही मोदींच्या 13 सभा झाल्या होत्या. आता सभा वाढल्या कारण आता मतदानाचे टप्पे वाढले आणि प्रत्येक टप्प्यात वेळ अधिक आहे. आता आमच्यासोबत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मत विभागले गेलेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रीत करून जाहीर सभा घेतली. आता आमच्या नेत्याला लोकं ऐकायला येतात तर यांच्या पोटात दुखतं, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला.

Published on: May 17, 2024 01:56 PM