4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?

4 जूनला समजेल शो कोणाचा… देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: May 17, 2024 | 2:41 PM

'त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत पातळीवर भाष्य केलं आहे, त्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही व्यक्तीगत वक्तव्य केलं तरी, ते काय आहेत आणि मी काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मी त्यांच्यावर व्यक्तीगत बोलायच ठरवलं, तर...', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल काय?

मुंबईत मतदानाचा शेवटचा टप्पा जवळ येत असताना भाजपाचे सर्व नेते उद्धव ठाकरेंना टार्गेट करतायत, मविआने टि्वट केलय, पाचवा फेज द उद्धव ठाकरे शो असं आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. 4 जूनला समजेल शो कोणाचा आहे.. असे म्हणत फडणवीसांनी मविआ नेत्यांना फटकारलं. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या काळात प्रचारात जी पातळी गाठलीय, त्यावरुन मला प्रश्न पडतो की, ते दिल्लीची निवडणूक लढवतायत की, गल्लीची निवडणूक. ज्या शब्दांचा ते उपयोग करतात, ज्या तऱ्हेचे पांचट जोक, पांचट टोमणे ते मारतात, हे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला अशोभनीय आहे. त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत पातळीवर भाष्य केलं आहे, त्याने मला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही व्यक्तीगत वक्तव्य केलं तरी, ते काय आहेत आणि मी काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मी त्यांच्यावर व्यक्तीगत बोलायच ठरवलं, तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

Published on: May 17, 2024 02:27 PM