2024 मध्ये काटे की टक्कर, लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत Vs राहुल नार्वेकर?

2024 मध्ये काटे की टक्कर, लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत Vs राहुल नार्वेकर?

| Updated on: Oct 03, 2023 | 11:02 AM

tv9 marathi Special Report | दक्षिण मुंबईत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात, भाजपकडून राहुल नार्वेकर मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा पराभव अटळ, कुणी केला मोठा दावा?

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत तर मुंबईतही आढावा बैठका सुरु झाल्यात… आणि दक्षिण मुंबईत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात, भाजपकडून राहुल नार्वेकर मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 6 महिन्यांचा वेळ आहे. मात्र, आतापासून ठाकरे गट आणि भाजपचे नेते आमनेसामने आलेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंतांचा पराभव अटळ असल्याचा दावा केला आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरोधात भाजप, विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यां ना मैदानात उतरवू शकते. उद्धव ठाकरे यांनीही नुकताच दक्षिण मुंबई लोकसभेचा आढावा घेतला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणालेत की, 2019 मध्ये दक्षिण मुंबईत आपण जिंकलो 2024मध्येही ही जागा आपल्याकडेच राहील. खासदार अरविंद सावंतच उमेदवार असतील, त्यामुळं कामाला लागण्याचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच जोमाने मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

Published on: Oct 03, 2023 11:02 AM