कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच बोलणार; शिंदेंचा रोख कुणावर?
लखनऊ ते लंडन काय प्रकरण आहे? असा एकनाथ शिंदे यांना सवाल केला असता, “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केलीय. 800 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे. मी योग्यवेळी माीहिती देईन. मी सूड भावनेनं कोणावर कोणतेच आरोप करत नाही..."
लखनऊमध्ये कुणाची तरी २०० एकर जमीन जप्त करण्यात आली असल्याची माहिती देत माझ्याकडे सर्व माहिती आहे. योग्यवेळ आली की समोर आणणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. ‘स्वतःचा स्वार्थ जागृत झाल्यावर कार्यकर्त्यांची किंमत राहत नाही’, टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी असंही म्हटलं आहे. तर लखनऊ ते लंडन काय प्रकरण आहे? असा एकनाथ शिंदे यांना सवाल केला असता, “लखनऊमध्ये कोणाची तरी २०० एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केलीय. 800 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे. मी योग्यवेळी माीहिती देईन. मी सूड भावनेनं कोणावर कोणतेच आरोप करत नाही. जी वस्तूस्थिती आहे ते सत्य आहे.” उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, त्यांना बनायचंच नव्हतं. ते म्हणत होते की, बाळासाहेबांचं स्वप्न होतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. पण स्वत:चा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिक, कार्यकर्त्याची किंमत नसते. मला पदाचा, सत्तेचा मोह नव्हता. शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली, त्याचं मी सोनं करतोय.