तसाच गेम एकनाथ शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
२००४ साली जो गेम उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत केला तोच गेम उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केल्याचे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंना युतीच्या पहिल्या सरकारपासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं. असा आरोप करताना फडणवीसांनी नारायण राणे यांच्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीची मुलाखतीतून नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहिल्यांदा युतीचं सरकार आल्यापासून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदासाठी महत्त्वकांक्षा होती. २००४ साली जो गेम उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत केला तोच गेम उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत केल्याचे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंना युतीच्या पहिल्या सरकारपासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं. असा आरोप करताना फडणवीसांनी नारायण राणे यांच्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय. २००४ मध्ये नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांची तिकीटं कापली तोच गेम उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत केला, असे म्हणत फडणवीसांनी सनसनाटी दावा केला. दरम्यान मुंबईत शेवटच्या टप्प्यातही भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि शिवसेनेत खरी परीक्षा ही मुंबईत आहे. त्यामुळे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.