लोकसभा निवडणूक २०२४ चा ताजा सर्व्हे, महाराष्ट्रात ‘महायुती’वर ‘मविआ’ भारी
VIDEO | शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फूटीनंतर निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? महाराष्ट्रात 'महायुती'वर 'महाविकास आघाडी' पडणार भारी? लोकसभा निवडणुकीचा ताजा सर्व्हे काय सांगतो, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फूटीनंतर निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात. एका सर्वेक्षणानुसार, पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचं नुकसान होत असून महाविकास आघाडीचे अधिक खासदार निवडणून येतील, अशी शक्यता वर्तविली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रात ‘महायुती’वर ‘मविआ’ भारी? ताज्या सर्व्हेनुसार महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक जागा मिळणार…२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला ८ महिने बाकी आहे. या निवडणुकीसाठा महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागलीये. त्याआधीच एक सर्व्हे समोर आलाय. इंडिया टुडे सी व्होटरनुसार राज्यात ‘मविआ’ ‘महायुती’वर भारी पडणार आहे. राज्यात महाविकास आघाडीला २८ तर महायुतीला २० जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या वर्षी पुन्हा मोदी सरकार येणार, असा अंदाज इंडिया टुडे सी व्होटरनुसार वर्तविण्यात आला आहे. तर इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३०६ जागांचा अंदाज आहे, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १९३ जागांचा अंदाज असल्याचेही इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार समोर आले आहे.