‘त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला’, मंत्री उदय सामंत यांचा गंभीर आरोप
पुणे आणि यवतमाळ येथे झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी हा मोठा आरोप केला आहे. तर हे कृत्य जे करून घेत आहेत. त्यांना नियती माफ करणार नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी हल्लाबोल केलाय. मात्र असं वक्तव्य करताना मंत्री उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे?
ज्यांना माझा पुळका आला आहे, त्यांनीच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं वक्तव्य करत शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी गंभीर आरोप केलाय. पुणे आणि यवतमाळ येथे झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी हा मोठा आरोप केला आहे. तर हे कृत्य जे करून घेत आहेत. त्यांना नियती माफ करणार नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी हल्लाबोल केलाय. मात्र असं वक्तव्य करताना मंत्री उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल केला जात आहे. सामंत म्हणाले, ‘आमच्या कुटुंबावर चांगलं बोललं गेलं. त्यानंतर आमच्या कुटुंबावर टीका केली गेली. आमच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर लोकांमधून आवाज येतो आता मतदान होणार नाही. तेव्हा आम्हाला चांगलं म्हटलं जातं. पण या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत. ज्यांना माझ्या कुटुंबाचा पुळका आला आहे त्यांनीच माझ्यावर पुण्यामध्ये हल्ला केला होता, मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण माझ्याबद्दल सहानुभूती दाखवण्याची काही गरज नाही. हे कृत्य जे करतात नियती त्यांना माफ करणार नाही’, असे सामंत म्हणाले.