दोनशे रूपये घ्या, पण… ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
अनेक राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंशाच्यावर पातळी ओलांडली आहे मात्र प्रचाराला काही ब्रेक लागला नाही. अशातच एका प्रचारसभेला आलेल्या लोकांचा पाण्याविना जीव कासावीस झाल्याचे पाहायला मिळाले. भर दुपारच्या वेळी शिर्डीत महाविकास आघाडीची सभा होती. सभेत काय घडलं?
आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असताना कित्येक ठिकाणी आजही प्रचार सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्या-राज्यात आपल्या नेत्यांना विजयी करण्यासाठी एकच चंग बांधलाय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात उष्णतेचा पारा वाढल्याने उष्माघाताने बळी जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अनेक राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंशाच्यावर पातळी ओलांडली आहे मात्र प्रचाराला काही ब्रेक लागला नाही. अशातच एका प्रचारसभेला आलेल्या लोकांचा पाण्याविना जीव कासावीस झाल्याचे पाहायला मिळाले. भर दुपारच्या वेळी शिर्डीत महाविकास आघाडीची सभा होती. भर उन्हात मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ राहाता येथील बाजारतळावर सभा घेण्यात आली. सभा भर उन्हात असल्याने लोक पाण्यासाठी व्याकुळ झालेले पहायला मिळाले .200 रुपये घ्या पण पाणी द्या, अशी म्हणण्याची वेळ सभेला आलेल्या लोकांवर आल्याचे पाहायला मिळाले.