लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात 'या' 8 मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात ‘या’ 8 मतदारसंघात मतदान

| Updated on: Apr 26, 2024 | 11:43 AM

आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालंय. महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा ८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. महाराष्ट्रातील ८ मतदारसंघासंह देशातील ८९ जागांवर आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झालीये.

लोकसभा निवडणुकीच्या आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालंय. महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा ८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. महाराष्ट्रातील ८ मतदारसंघासंह देशातील ८९ जागांवर आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. देशात भाजपा प्रणीत NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA अशी लढत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी देशात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळपासून चांगली सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी उत्साहात सुरूवात झाली तर काही ठिकाणी मतदानाचा निरुत्साह दिसून आला. सामान्य मतदारांसह अनेक दिग्गज नेत्यांसह लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

Published on: Apr 26, 2024 11:43 AM