Lok Sabha Elections 2024 : कमिंग सून... 4 जून, देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार?

Lok Sabha Elections 2024 : कमिंग सून… 4 जून, देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार?

| Updated on: May 31, 2024 | 11:06 AM

१ जून रोजी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर साऱ्या देशाला ४ जूनला लागणाऱ्या निकालाची एकच प्रतिक्षा आहे. सध्यातरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. १ जूनला होणाऱ्या मतदानाच्या शेवट्च्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान पार पडणार आहे. तर ४ जूनला देशाच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे.

येत्या ४ जून रोजी देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार? याचा फैसला होणार आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला आहे. १ जून रोजी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर साऱ्या देशाला ४ जूनला लागणाऱ्या निकालाची एकच प्रतिक्षा आहे. सध्यातरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. १ जूनला होणाऱ्या मतदानाच्या शेवट्च्या टप्प्यात ५७ जागांवर मतदान पार पडणार आहे. तर ४ जूनला देशाच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. यासंपूर्ण लोकसभेच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक १८, अमित शाह यांनी ११, राहुल गांधी ३, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी २ सभा राज्यात घेतल्याची माहिती आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोसह १०० हून अधिक सभा घेतल्या. यासोबत शरद पवार यांनी ६० हून अधिक तर अजित पवार यांनी २० हून अधिक सभा घेतल्या. दुसरीकडे काँग्रेसच्या नाना पटोले यांनी ५० हून अधिक, एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक, उद्धव ठाकरेंनी ३० हून अधिक तर राज ठाकरे यांनी ४ सभा घेतल्या…यानंतर मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला? काय आहे देशाचा मूड हे मात्र ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

Published on: May 31, 2024 11:06 AM