भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड वाहनात सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूप येथील सोनापूर सिग्नलवरील वाहनात तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम आहे. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले असून पथकाने पकडलेल्या कॅशची मोजणी सुरू
देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे तर राजकीय नेते मंडळीच्या प्रचारसभा, रॅलीचा धडाका देखील तितकाच जोरात सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून धडक कारवाई केल्याचे समोर आले आहे. भांडुप येथील सोनापूर सिग्नल येथे नाकाबंदी दरम्यान तीन ते साडेतीन कोटींची कॅश पकडण्यात आली आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री भांडूपमध्ये ही मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भांडूप येथील सोनापूर सिग्नलवरील वाहनात तीन ते साडे तीन कोटी रुपयांची रक्कम आहे. ही रोकड रक्कम सध्या भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले असून पथकाने पकडलेल्या कॅशची मोजणी सुरू केली आहे. आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेली गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करण्याऱ्या गाडीसारखी आहे. परंतु गाडीतील ही रक्कम कुठे जात होती, ती रक्कम कोणाची आहे, यासंदर्भात काहीच उत्तरे गाडी चालकाने दिली नाही, त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.