बीडमध्ये बोगस मतदान? ऑडिओ-व्हिडीओ क्लिपनं खळबळ, 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट

बीडमध्ये बोगस मतदान? ऑडिओ-व्हिडीओ क्लिपनं खळबळ, ‘ते’ 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट

| Updated on: May 19, 2024 | 11:46 AM

बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय. रोहित पवार यांनी पाच व्हिडीओ ट्वीट करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. रोहित पवार यांनी बीडच्या परळीत काही गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. इतकंच नाहीतर त्यांनी त्याचे काही व्हिडीओ देखील ट्वीट केलेत.

बीड लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाच व्हिडीओ ट्वीट करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही तर पंकजा मुंडे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचदरम्यान, एक पत्रकार आणि एक मतदान अधिकारी यांची कथित ऑडिओ क्लिप बीड जिल्ह्यात व्हायरल होतेय. त्यामुळे विविध चर्चांना पेव फुटलाय. रोहित पवार यांनी बीडच्या परळीत काही गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. इतकंच नाहीतर त्यांनी त्याचे काही व्हिडीओ देखील ट्वीट केलेत. त्या पैकी एका व्हिडीओमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गिते मतदान केंद्रातील कारभारावरून अधिकाऱ्यांना रागवताना दिसताय. बघा व्हिडीओ…

Published on: May 19, 2024 11:46 AM