नामर्द म्हणत ‘शिवसेना’चा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर सडकून हल्लाबोल
पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी नुकताच केला होता. त्याला गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतून उत्तर दिले. 'आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?' अशी जहरी टीका गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली. बघा काय केला हल्लाबोल?
यंदाची लोकसभेची निवडणूक ही देशाची नेतृत्व ठरवणारी महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे योग्य उमेदवार निवडला पाहिजे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मतदारांना योग्य उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं. यावेळी ते असेही म्हणाले की, चला आपण इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया पण जर ते निवडून आले तर मुंडकं काँग्रेसचं, कंबर टीएमसीचं, हात-पाय उद्धव ठाकरेंचे आणि बाकी शरीर शरद पवार यांचे असं कसं चालेल? असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी केलाय. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे गट, संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी नुकताच केला होता. त्याला गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतून उत्तर दिले. ‘आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?’ अशी जहरी टीका त्यांनी राऊतांवर केली. बाळासाहेब म्हणायचे ज्यांच्यावर केस नाहीत तो शिवसैनीक नाही, असा टोला ही त्यांनी राऊत यांना लगावला. इतकंच नाहीतर शिवसेनेचा अर्थ सांगत गुलाबराव पाटलांनी राऊतांवर हल्लाबोल केलाच.