‘ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत, हा इतिहास…’; राज ठाकरेंना कोणी डिवचलं?
'मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून राज ठाकरे सभा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. मात्र राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणच्या उमेदवाराचा पराभव होतो. हा इतिहास अनेक वर्षाचा आहे. राज ठाकरे ज्या उमेदवाराचा प्रचार करतील, मात्र आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील'
राज ठाकरे आपली नाही तर दुसऱ्यांची भूमिका मांडत असतात, असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला तर दुसऱ्यांची स्क्रिप्ट राज ठाकरे वाचत असतात, असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला. असेही म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून राज ठाकरे सभा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. मात्र राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणच्या उमेदवाराचा पराभव होतो. हा इतिहास अनेक वर्षाचा आहे. राज ठाकरे ज्या उमेदवाराचा प्रचार करतील, मात्र आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही वैभव नाईक यांनी केला. तर नारायण राणेच्या प्रचाराला ठाकरे जाणे हाच खरा बाळासाहेबांचा अपमान होता किंवा राणेंच्या प्रचाराला शिंदेने जाणे हा देखील बाळासाहेबांचा अपमान होता. बाळासाहेबांचा अपमान शिवसैनिक कधीच सहन करणार नाही, मतपेटीच्याद्वारे आम्ही दाखवून देणार, असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले.