शिवसेना vs शिवेसना… जनतेचा कौल कुणासोबत शिंदे की ठाकरे? कोणत्या शिवसेनेला सर्वाधिक जागा?
महाराष्ट्रातील जनता नेमकी कुणासोबत याचा फैसला येत्या ४ जून रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी देशात आणि राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. यानुसार शिंदे आणि ठाकरे यांच्या लढाईत उद्धव ठाकरे हे वरचढ असल्याचे समोर आले आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील जनता नेमकी कुणासोबत याचा फैसला येत्या ४ जून रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी देशात आणि राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे समोर आला आहे. यानुसार शिंदे आणि ठाकरे यांच्या लढाईत उद्धव ठाकरे हे वरचढ असल्याचे समोर आले आहे. शिवसेना फुटीनंतर पहिलीच परीक्षा लोकसभा निवडणुकीची झाली आहे. TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर भारी पडताना दिसताय. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २३ जागा लढल्या होत्या. त्यापैकी १४ जागा निवडून येतील असा अंदाज TV9 पोलस्ट्रेटच्या आकडेवारीवरून आहे. तर महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने १५ जागा लढल्या होत्या. त्यापैकी शिंदे गटाला ४ जागा मिळणार आहे. दरम्यान, टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.