प्रचारात 400 पारची दणक्यात घोषणा पण भाजप 250 च्या आत, ‘इंडिया’नं मोदींना कुठं रोखलं?
भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याला इंडिया आघाडीने अखेर ब्रेक लावला. महाराष्ट्रासह पाच राज्यात विरोधकांनी भाजपची नाकाबंद केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला जोरदार झटका बसला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपला रोखलं
भाजपने निवडणूक प्रचारात ४०० पारचा नारा जोरदार दिला. मात्र भाजपला २५० जागादेखील स्वबळावर मिळालेल्या नाहीत. त्यातच उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना पसंती दिली. भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याला इंडिया आघाडीने अखेर ब्रेक लावला. महाराष्ट्रासह पाच राज्यात विरोधकांनी भाजपची नाकाबंद केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला जोरदार झटका बसला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपला रोखल्यानं त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं नाही. ज्या पाच राज्यांनी भाजपला रोखलं त्यात पहिल्या नंबरवर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांची समादवादी पार्टी आणि काँग्रेसने जोरदार कामगिरी करत मोदी आणि योगींना जबर फटका दिला. बघा स्पेशल रिपोर्ट आणखी कोणत्या राज्यात कोणत्या उमेदवारांनं भाजपच्या जागेवर वरचढ ठरत विजय मिळवला.