लोकसभेच्या आधीच पुन्हा एकदा मविआत बिघाडी? आता काय कारण? शिवसेना नेत्याने थेट व्यक्त केली नाराजी

| Updated on: May 17, 2023 | 2:21 PM

लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागाचं गणित सुटलं असलं तरी मविआतील अंतर्गत वाद काही मिटताना दिसत नाही. आता नव्याच कारणांमुळे मविआतील वाद समोर आला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असला तरी महाविकास आघाडीनं आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. तर प्रत्येकी 16 जागांवर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागाचं गणित सुटलं असलं तरी मविआतील अंतर्गत वाद काही मिटताना दिसत नाही. आता नव्याच कारणांमुळे मविआतील वाद समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट आपल्याच मित्र पक्षांवर आरोप केले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमांमधील मुलाखतीमुळे शिवसेनेत नाराजी असल्याचेही ते म्हणाले. तर महाविकास आघाडीच्या बैठकित झालेल्या चर्चेपेक्षा वेगळे मुद्दे चर्चेले जातात. मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून ही नाराजी असल्याचे जाधव यांनी सांगितलं आहे.

Published on: May 17, 2023 02:21 PM
Karnataka New CM : कर्नाटकचा तिढा सुटला? ‘हा’ चेहरा असणार नवा मुख्यमंत्री, दिमतीला 3 उपमुख्यमंत्री
२४ तासाच्या आत माफी मागा, नाहीतर… संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याचं थेट आव्हान