TV9 Exclusive : बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना मोदी भावूक, पंतप्रधानांची 2024 मधील महामुलाखत; आज रात्री 8 वाजता
टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मोदींना अनेक मुद्द्यांवर सवाल केलेत. टीव्ही ९ नेटवर्कसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राऊंड टेबल मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान बोलताना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही ९ ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली आहे. टीव्ही ९ मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मधील सर्वात मोठी महामुलाखत दिली आहे. टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी मोदींना अनेक मुद्द्यांवर सवाल केलेत. टीव्ही ९ नेटवर्कसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राऊंड टेबल मुलाखत झाली. या मुलाखती दरम्यान बोलताना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मीनाताईंचीही आठवण यावेळी मोदींनी काढली तर शरद पवार आणि पवार कुटुंबीयांबद्दल बोलताना त्यांनी सडेतोड उत्तरही दिलेत. राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण मुलाखत टीव्ही ९ मराठीवर आज रात्री ८ वाजता पाहता येणार आहे.