Stock Market Big Breaking : शेअर बाजारात मोठा आपटीबार, सेन्सेक्स ‘इतक्या’ अंकांनी घसरला
लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्ण समोर आला नसताना मतमोजणी सुरू असतानाच शेअर बाजारात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या निकालाच्या दिवशी शेअर बाजाराने अनेकांनी गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली आहे.
लोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सध्या सुरू आहे. मात्र सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्ण समोर आला नसताना मतमोजणी सुरू असतानाच शेअर बाजारात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या निकालाच्या दिवशी शेअर बाजाराने अनेकांनी गुंतवणूकदारांची मोठी निराशा केली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टीमध्ये जवळपास 600 अंकांची घसरण झाली होती. तर बँक निफ्टीमध्ये 1500 अंकांनी मोठी घसरण पहायला मिळाली होती. आता निकलाच्या मतमोजणीतील आकड्यांमध्ये जसे बदल होताय तसा शेअर बाजारावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. दुपारपर्यंत सेन्सेक्समध्ये 5 हजार 500 अंकांची घसरण झाली आहे. दरवर्षी निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा शेअर बाजारावरील आकड्यांवर होताना दिसतो मात्र यंदा त्या आकड्याचे प्रमाण काहिसे जास्त असल्याचे दिसतेय.