यंदा अजित पवारांना कुणाचं आव्हान? बारामती लोकसभेतील 6 विधानसभांचं नेमकं गणित काय?

यंदा अजित पवारांना कुणाचं आव्हान? बारामती लोकसभेतील 6 विधानसभांचं नेमकं गणित काय?

| Updated on: Jun 23, 2024 | 11:01 AM

लोकसभेत सुनेत्रा पवार यांच्या बाजूने दौड, इंदापूर, बारामती, खडकवासला येथील आमदार होते. तर सुप्रिया सुळेंच्या बाजून पुरंदर आणि भोरचे आमदार होते. तर या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला. दरम्यान, बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभांचं गणित नेमकं काय असणार? बघा स्पेशल रिपोर्ट

बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बारमती लोकसभा मतदारसंघात खडकवासला, दौंड, भोर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर असे सहा मतदारसंघ येतात. खडकवासला येथून भाजपचे भीमराव तापकीर, दौंड येथून भाजपचे राहुल कूल, भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे, पुरंदरातून काँग्रेसचे संजय जगताप, बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघात लोकसभेत महायुतीचं पारडं जड होतं. सुनेत्रा पवार यांच्या बाजूने दौड, इंदापूर, बारामती, खडकवासला येथील आमदार होते. तर सुप्रिया सुळेंच्या बाजून पुरंदर आणि भोरचे आमदार होते. तर या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला. दरम्यान, बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभांचं गणित नेमकं काय असणार? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 23, 2024 11:01 AM