Lok Sabha Election Results 2024 : किसमे कितना है दम, अवघ्या काही तासात फैसला.... असली-नकली कोण? महाराष्ट्र उत्तर देणार?

Lok Sabha Election Results 2024 : किसमे कितना है दम, अवघ्या काही तासात फैसला…. असली-नकली कोण? महाराष्ट्र उत्तर देणार?

| Updated on: Jun 04, 2024 | 9:03 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आजचा दिवस असून मतमोजणी सुरू आहे. या फैसल्याआधी राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. तर राज्यात पवारांबरोबर शिंदे आणि ठाकरे यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.

देशाची पुढील पाच वर्षांसाठीची सूत्र कुणाच्या हाती जाणार याचा फैसला अवघ्या काही तासात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आजचा दिवस असून मतमोजणी सुरू आहे. या फैसल्याआधी राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. तर राज्यात पवारांबरोबर शिंदे आणि ठाकरे यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलंच घमासान रंगलं आहे. काही सर्व्हेमध्ये कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार? याबाबतच्या अंदाजात मोठा फरक असल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सर्व्हे अॅक्सिस माय इंडियानुसार महायुतीला २८ ते ३१, मविआ १६ ते २० जागा मिळतील असा अंदाज वर्तविला जातोय. तर एआयच्या सर्व्हेनुसार, महायुती २६ ते ३४ तर मविआ १५ ते २१ जागांवर विजयी होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 04, 2024 09:03 AM