इथं सगळेच सेम टू सेम… रायगड लोकसभेच्या रिंगणात भलतंच डेंजर, नेमकं काय घडलंय?
रायगड लोकसभेच्या रिंगणात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आनंद गिते यांना तिकीट देण्यात आलंय. तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. मात्र आपल्याच नावामुळे या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढलीये. कारण....
रायगड लोकसभेच्या रिंगणात ठाकरेंच्या शिवेसनेचे उमेदवार आनंत गिते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. थोर कवी, नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर म्हणतो, नावात काय? याचं उत्तर सध्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात मिळतंय. रायगड लोकसभेच्या रिंगणात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आनंद गिते यांना तिकीट देण्यात आलंय. तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. मात्र आपल्याच नावामुळे या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढलीये. कारण रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गीते नावाच्या दोघांनी उमेदवारांनी अर्ज भरलाय. तर सुनील तटकरे या नावाच्या आणखी एकानं अर्ज भरलाय. ठाकरेंचे उमेदवार आहेत, अनंत गंगाराम गीते… अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते या दोघांनी अर्ज भरलेत. यासोबतच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, सुनील दत्तात्रय तटकरे… तर सुनील दत्ताराम तटकरे यांनीही अर्ज भरलाय. बघा नेमकं काय घडतंय?