लवकरच जागावाटपावर तोडगा निघणार? महाविकास आघाडीचं जागावाटप कधी ठरणार?
लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप ठरणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अजून त्यासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही.
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे मात्र अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप ठरलं नाही. तर लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप ठरणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अजून त्यासंदर्भात तोडगा निघालेला नाही. तर जागावाटपावर चर्चा असून कोणतीही मागणी केली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले तर महाराष्ट्रात वंचितसह तीनपक्ष एकत्र लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने लवकरच जागा वाटपावर तोडगा काढला जाणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय. बघा जागा वाटपासंदर्भात नेमकं कोण काय-काय म्हणालं?