परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला… भर सभेत राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरून बोलताना नाराय राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि लोकसभा निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी खुलं आव्हान दिलंय
सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि लोकसभा निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी खुलं आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरून बोलताना नाराय राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणे म्हणाले, येणाऱ्या सिंधुदुर्ग दौऱ्यात असे शब्द बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो. आमच्या नेत्यांवर टीका चालणार नाही, असे म्हणत नारायण राणेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली. पुढे राणे असेही म्हणाले, अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे राणे असेही म्हणाले की, या कोकणाला त्यांनी काहीच दिलं नाही. कोणतीही योजना दिली नाही. काही कामाचा असा मुख्यमंत्री…. महाराष्ट्राला काय दिलं, कोकणाला काय दिलं? असा सवाल करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.