विधानसभेतही ‘मविआ’ची सत्ता येणार? काय सांगतो सकाळचा सर्व्हे? मतदारांची पसंती कोणाला?
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ पैकी ९ उमेदवार विजयी झालेत आणि विधानसभेच्या निवडणुकीतही विजयी होऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पण सकाळच्या सर्व्हेनुसार महायुतीला धक्का बसताना दिसतोय. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची पसंती मविआला...
येत्या पाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळने केलेल्या सर्व्हेत महायुतीची चिंता वाढताना दिसतेय. महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जनतेची पसंती महाविकास आघाडीला असल्याचे टक्केवारी सांगतेय. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ पैकी ९ उमेदवार विजयी झालेत आणि विधानसभेच्या निवडणुकीतही विजयी होऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पण सकाळच्या सर्व्हेनुसार महायुतीला धक्का बसताना दिसतोय. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची पसंती मविआला असल्याचे दिसतेय. मविआला ४८.७ टक्के आणि महायुतीला ३३.१ टक्के पसंती मिळाली आहे. तर विधानसभेत महायुती येणार की नाही हे म्हणणारे ४.९ टक्के आहेत तर माहिती नाही किंवा सांगता येत नाही हे म्हणणाऱ्याची टक्केवारी १३.३ टक्के आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 14, 2024 10:39 AM
Latest Videos