BIG BREAKING | राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल, आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार

BIG BREAKING | राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल, आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार

| Updated on: Aug 07, 2023 | 11:02 AM

VIDEO | सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता राहुल गांधी यांच्या खासदारकीबाबत अधिसूचना जारी... मोदी आडनाव प्रकरणी सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती त्यानंतर पुन्हा दिलासा

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ | मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला असून राहुल गांधी यांची 24 मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या आधिसूचनेत नमूद केले आहे.

Published on: Aug 07, 2023 11:01 AM