शाहांनी फुंकलं लोकसभेचं रणशिंग, युवकांना साद घालत म्हणाले; भाजपला मत म्हणजे…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची जळगावात जाहीर सभा पार पडली. सभास्थळी हजर असलेल्या युवकांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. भाजपला मत म्हणजे...
जळगाव, ५ मार्च २०२४ : जळगावमध्ये भाजप युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आल आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी युवकांसोबत संवाद साधला. या सभेतून अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं यावेळी त्यांनी युवकांना साद घालत भाजपला मतं देण्याची आवाहनही केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची जळगावात जाहीर सभा पार पडली. सभास्थळी हजर असलेल्या युवकांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, ‘मी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आलो आहे. मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक आहे, असं वाटत आहे, तर या भ्रमात राहू नका. २०४७ मध्ये भारत विकसित करण्यासाठी आणि आत्मनिर्भर करण्यासाठीची ही निवडणूक आहे. २०४७मध्ये या मंचावरील लोक असतील नसतील. पण समोरचे तरुण २०४७मध्ये असतील. त्या विकसीत भारतात हे लोक असतील. भाजपला मतदान करणं म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीचं मतदान असेल. जे तरुण आहे, त्यांनी मतदान करताना देशाला विश्वगुरू करणाऱ्या पक्षाला मतदान करावं. ज्या पक्षात लोकशाही नाही, घराणेशाही आहे. असे पक्ष देशाला कसे पुढे नेणार.’ असे त्यांनी म्हटले तर भाजपला मत म्हणजे तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला मत. भाजपला मत म्हणजे महान भारताच्या रचनेला मत. भाजपला मत म्हणजे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं, असेही त्यांनी म्हटले.