लोणावळा घाटातही कोसळली दरड, ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागणार
लोणावळा घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.
लोणावळा घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूक पुढील दोन ते तीन दिवस विस्कळीत राहणार असल्याची माहिती आहे. तर टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा ट्रेन चालवण्यासाठी ट्रॅक सेफ नसल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुढील चार-पाच तासांमध्ये कल्याण इगतपुरी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. तसेच बदलापूर ते कर्जत आणि आसनगाव ते कसारा ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेन या स्टेशन दरम्यान बंद ठेवण्यात आलेली आहे. कर्जत लोकल फक्त अंबरनाथ पर्यंत आणि कसारा लोकल टिटवाळा पर्यंत चालवण्यात येत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुद्धा होताना दिसत आहेत
Latest Videos