मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा; कारण काय?
VIDEO | मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक पूर्ण ठप्प
मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरून (Parshuram Ghat) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात माती आणि दरड रस्त्यावर कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाल्याने परशुराम घाटात वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात झाली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील चालू असणाऱ्या कामाला बसला असल्याचे सांगितले जात आहे. काल रात्रीपासून घाट मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे रात्रीपासूनच घाटात काही वाहनं अडकून पडली होती. मात्र क्रेनच्या सहाय्याने या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे. सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक परशुराम घाटात पूर्ण ठप्प आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर डोंगर कोसळून आलेली दरड बाजूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.