VIDEO : Nanded | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी तोट्यात, नांदेड आगाराला 15 कोटींचा तोटा

VIDEO : Nanded | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी तोट्यात, नांदेड आगाराला 15 कोटींचा तोटा

| Updated on: Dec 25, 2021 | 1:34 PM

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. एसटी महामंडळाला रोज कोट्यवधींचा तोटा होतोय. 

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्वच आगारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नांदेड आगाराला 15 कोटींचा तोटा झाला आहे. तेलंगाणा, कर्नाटक या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा अगदीच तुटपुंजा आहे. महाराष्ट्रात 15 वर्षांपासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 16 हजार पगार मिळतो. त्यामध्ये आता सरकारने वाढ केली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. एसटी महामंडळाला रोज कोट्यवधींचा तोटा होतोय.