MHADA Lottery : मुंबईकरांना घराची लॉटरी लागणार? पण कधी? घ्या जाणून
मुंबईत हक्काचं घर असावं असं तुमचं स्वप्न असेल तर आता ते लवकर पूर्ण होणार आहे. कारण मुंबईतील म्हाडाच्या चार हजार घरांची लॉटरी मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे.
मुंबईत हक्काचं घर असावं असं तुमचं स्वप्न असेल तर आता ते लवकर पूर्ण होणार आहे. कारण मुंबईतील म्हाडाच्या चार हजार घरांची लॉटरी मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. यामध्ये अत्यल्प, अल्प गटातील 2 हजार 638 घरांचा समावेश असणार आहे.
म्हाडाच्या बहुप्रतिक्षा असणाऱ्या मुंबई मंडळाची लॉटरी मार्चमध्ये जाहीर होणार असून मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीत पहाडी गोरेगाव, कन्नमवारनगर, वडाळा येथील घरांचा समावेश असणार आहे. तर गोरेगावच्या अत्यल्प गटातील 1 बीएचके घरांसाठी केवळ 35 लाख रूपये किंमत मोजावी लागणार आहे. तर अल्प गटाच्या घरांची किंमत 45 लाख रूपये असणार आहे. पहाडी गोरेगावमध्ये 23 माळ्यांच्या 7 इमारतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 239 घरे उपलब्ध आहे. या घरांचे क्षेत्रफळ हे 322.60 चौरस फूट इतके असणार आहे. उन्नतनगर नंबर 2, प्रेमनगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 708 घरे आहेत. इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा..