धर्मांतरविरोधी कायदा आणखी प्रभावी होणार? सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले…
VIDEO | लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्याच्या विचाराधीन ? सभागृहात देवेंद्र फडणवीस काय म्हटले
मुंबई : मुंबईसह राज्यभरात धर्मांतराविरोधी कायद्यावरून अनेक मोर्चे निघाले होते. दरम्यान, धर्मांतरविरोधी कायदा आणखी प्रभावी करू, अशी माहिती विधिमंडळातील सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लव्ह जिहाद, बळजबरीने धर्मांतर करणे असे प्रकार राज्यात वाढत आहे. या विरोधात हजारो लाखोंचे सकल हिंदू समाजाचे मोर्चे देखील राज्यात निघाले आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या विरोधात असलेल्या जनतेचा मनातील रोष पाहता आणि धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्याचे राज्य सरकार विचारधीन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. तर हा कायदा करताना सध्या ज्या राज्यांमध्ये असे कायदे आहेत त्यांचा देखील अभ्यास नवा कायदा तयार करण्यापूर्वी केला जाणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Mar 23, 2023 08:02 PM
Latest Videos