स्वातंत्र्याच्या लढ्यात इंदिरा आणि फिरोझ यांची प्रेमकहाणी
राजकारणी म्हटलं तर त्याचं आयुष्य जनसेवा, शह-काटशह, लोकांचा गराडा अशा गोष्टींनी व्यापलेलं असेल असा आपला समज असतो. मात्र, त्यांनाही खासगी आयुष्य आहे, त्यांच्या मनातही कधीतरी वसंत बहरत असावा हे आपण विसरून जातो. राजकारणातही अशा कित्येक लव्ह स्टोरीज होऊन गेल्यायत ज्या 'अजरामर प्रेमकहाणी' म्हणून नोंदवल्या जाव्यात अशा आहेत.
राजकारणी म्हटलं तर त्याचं आयुष्य जनसेवा, शह-काटशह, लोकांचा गराडा अशा गोष्टींनी व्यापलेलं असेल असा आपला समज असतो. मात्र, त्यांनाही खासगी आयुष्य आहे, त्यांच्या मनातही कधीतरी वसंत बहरत असावा हे आपण विसरून जातो. राजकारणातही अशा कित्येक लव्ह स्टोरीज होऊन गेल्यायत ज्या ‘अजरामर प्रेमकहाणी’ म्हणून नोंदवल्या जाव्यात अशा आहेत. भारतीय राजकारणातील इंदिरा-फिरोझ यांची प्रेमकहाणीसुद्धा त्यापैकीच एक. मूळात इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि फिरोझ गांधी ( Feroze Gandhi) यांच्या प्रेमकहाणीला अनेक पदर आहेत. त्यांच्या प्रेमकहाणीत आपुलकी आहे. एकमेकांविषयीची तळमळ आहे. त्याचबरोबर राजकीय महत्वाकांक्षा, रोजच्या जीवनात होत असलेल्या कुचंबनेमुळे नात्याची फरफटसुद्धा इंदिरा-फिरोझच्या प्रेमात आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या धगीमध्ये देशप्रेमाची आग कित्येकांच्या मनात पेटली होते, अगदी याच काळात इंदिरा-फिरोझच्या मनातही स्वतंत्र्यासोबतच प्रेमाचा अंकूरही बहरत राहिला.