शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?

शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?

| Updated on: Apr 29, 2024 | 1:53 PM

अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल.... यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झालीये

शरद पवार गटाचे माढ्याचे नेते अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाल्याचे आज पाहायला मिळाले. यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर या घडामोडींना वेग आला असून माढ्यातील राजकारण बदलत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची तुतारी हाती घेतली आहे. अशातच आता भाजप आता शरद पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र जर अभिजीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास शरद पवारांना धक्का तर बसेलच मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एक तरुण, तडफदार नेतृत्व भाजपाकडे जाणार यात काही शंका नाही.

Published on: Apr 29, 2024 01:53 PM