सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?

सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 28, 2024 | 3:59 PM

सोलापूर करमाळा माढा लोकसभेचे धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार अशोक ज्ञानदेव वाघमोडे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी रात्री अडीच वाजेदरम्यान घातला दरोडा

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका सुरू झाल्यात. महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी पहिला टप्पा तर २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदार पार पडले. आता आगामी तिसरा टप्पा ७ मे रोजी होणार असून या मध्ये सोलापूर, माढा या ठिकाणी मतदार होणार आहे. मात्र यापूर्वीच माढा लोकसभेचे धनगर समाजाचे अपक्ष उमेदवाराच्या बाबतीत एक बातमी समोर येत आहे. सोलापूर करमाळा माढा लोकसभेचे धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार अशोक ज्ञानदेव वाघमोडे यांच्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथील घरावर हा दरोडा घालण्यात आला. अज्ञात दरोडेखोरांनी रात्री अडीच वाजेदरम्यान दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराची माहिती जेऊर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी जेऊर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. जेऊर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिल्यानंतर पुढील अनर्थ टळल्याचे अशोक वाघमोडे यांनी सांगितले.

Published on: Apr 28, 2024 03:59 PM