अजित दादा अन् भाजपला मोठा धक्का देणार! ‘पक्षात मोठी इन्कमिंग होणार’, शरद पवार काय म्हणाले?
आगामी विधानसभा निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अशातच पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षात मोठी इन्कमिंग होणार याची चुनूक शरद पवार यांनी दाखवली. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण विद्यमान आमदारांसह दोन इतर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता कामाला लागले असून भाजप आणि अजित पवारांना धक्का देण्याच्या हालचाली त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांचे आमदार आणि नेते उघडपणे शरद पवारांच्या भेटी घेताय. माढ्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंनी पुण्यात मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले विलास लांडेही शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. दौंडचे रमेश आप्पा थोरात यांनीही शरद पवारांची भेट घेवून कार्यकर्त्यांच्या आग्रहात्सव तुतारी हाती घेण्याची घोषणा केली. चंदगडचे शिवाजीराव पाटील ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होतेय.