राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेत्याकडून अनोखी भेट

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेत्याकडून अनोखी भेट

| Updated on: Jun 14, 2023 | 7:09 AM

VIDEO | राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून ठाण्यात महाआरतीचं आयोजन

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे पदाधिकारी यांच्या वतीने महा आरतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात या महा आरतीचे आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हिंदू धर्माचे जतन करण्याचा आणि हिंदू धर्म वाढवण्याचा आरतीच्या माध्यमातून संदेश देण्याात आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्यासाठी आम्ही ही आरती करत आहोत. त्यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आरती आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे. राज ठाकरे नेहमीच हिंदुत्वासाठी झटत आलेले आहेत. परंतु फक्त आरती करून हिंदुत्व टिकवता येणार नाही तर त्या त्याला आचरणात आणावे लागेल आम्ही तो नेहमीच प्रयत्न करत असतो. तर आगामी महापालिका निवडणुकीत फक्त ठाणे महापालिकेत नाहीतर सर्व महापालिकांमध्ये मनसेचा मोठ्या संख्येने विजय घडवून आणणं हीच राज ठाकरे यांना आमच्याकडून वाढदिवसाची भेटवस्तू असेल…’, असे ते म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 07:09 AM