महायुतीत अद्याप 7 लोकसभा जागांचा पेच कायम? पारंपारिक जागा भाजपला, विरोधकांचा निशाणा
महायुतीने ४१ जागांवर आपले उमेदवार जाहीर केलं तर अजून ७ जागांचा पेच कायम आहे. महायुतीतील सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरील वाद सुटलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपनं घेतलीये. नारायण राणेंचा सामना ठाकरेंचे विनायक राऊतांशी होणार तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले लोकसभा लढवणार
सातारा आणि रत्नागिरी या दोन्ही लोकसभांवर उमेदवार जाहीर झालेत. मात्र महायुतीत अद्याप ७ जागांचा पेच कायम आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ज्या जागा लढत होती त्या जागा भाजपकडे गेल्याने ठाकरेंच्या शिवसेने शिंदेंवर टीका केली. सांगली आणि मुंबईच्या जागांवरून वाद आहेत. मात्र महाविकास आघाडीने पूर्ण ४८ जागांवर उमेदवार जाहीर केले. तर महायुतीने ४१ जागांवर आपले उमेदवार जाहीर केलं तर अजून ७ जागांचा पेच कायम आहे. महायुतीतील सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरील वाद सुटलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपनं घेतलीये. नारायण राणेंचा सामना ठाकरेंचे विनायक राऊतांशी होणार आहे तर दुसरीकडे सातारची जागाही भाजपकडे गेल्याने उदयनराजे भोसले लोकसभा लढवणार आहेत. त्यांचा सामना शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंशी होणार आहे. यादरम्यान सांगलीवरून मविआमध्ये बंडखोरी माजली आहे… बघा नेमकं काय घडतंय….