मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् शरद पवारांनी किती जागा जिंकणार यांचं केलं भाकित, थेट सांगितला आकडा

मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् शरद पवारांनी किती जागा जिंकणार यांचं केलं भाकित, थेट सांगितला आकडा

| Updated on: May 10, 2024 | 10:34 AM

लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे बाकी आहेत. त्या आधीच या निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याचं भाकित केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकू शकतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. बघा शरद पवारांनी नेमका काय केला दावा?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे बाकी आहेत. त्या आधीच या निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याचं भाकित केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकू शकतं असं शरद पवारांनी म्हटलं आहे. आम्हाला ३० ते ३५ अशा जागा मिळणार, असा दावा शरद पवारांनी केला. म्हणजेच शरद पवारांच्या दाव्यानुसार, शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला १३ ते १८ जागा मिळणार तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळणार असल्याचं भाकित पवारांनी केलंय. शरद पवारांनी दावा केल्यानंतर पवारांनी भाजपच्या गोटात चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट शरद पवार यांनी काय केला मोठा दावा?

Published on: May 10, 2024 10:34 AM