Uddhav Thackeray : तयारीला लागा... विधानसभेला 185 जागा जिंकणार? ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश काय?

Uddhav Thackeray : तयारीला लागा… विधानसभेला 185 जागा जिंकणार? ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश काय?

| Updated on: Jun 11, 2024 | 11:37 AM

जागा वाटपाचा विचार तुम्ही घेऊ नका, जागा वाटप हे योग्य वेळी होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले आहे. तर राज्यात महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आता तुम्ही कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांनी दिले आहेत.

लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आता विधानसभा निवडणुकीत १८५ जागा जिंकण्याचं महाविकास आघाडीचे लक्ष आहे, त्यानुसार हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कामाला लागा, असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. तर जागा वाटपाचा विचार तुम्ही घेऊ नका, जागा वाटप हे योग्य वेळी होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले आहे. तर राज्यात महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आता तुम्ही कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांनी दिले आहेत. लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींना महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढून रोखलं आहे. येत्या विधानसभेलाही महाविकास आघाडी ताकदीने लाढेल आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 11, 2024 11:37 AM