कोल्हापुरातून राजे VS राजे? राऊतांकडून छत्रपतींच्या घरात वाद लावण्याचं काम, कुणाची टीका?
शाहूमहाराज यांना राज्यसभेत न पाठवल्यास कोल्हापुरातून शाहूमहाराज यांना लोकसभेसाठी महाविकास आघाडी उतरवू शकते अशी चर्चा सुरूये. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयारी सुरू करण्यात आलीये.
मुंबई, ८ फेब्रुवारी, २०२४ : महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहूमहाराज यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी सुरूये तर यासोबतच महाविकास आघाडीचा प्लान बी देखील रेडी आहे. शाहूमहाराज यांना राज्यसभेत न पाठवल्यास कोल्हापुरातून शाहूमहाराज यांना लोकसभेसाठी महाविकास आघाडी उतरवू शकते अशी चर्चा सुरूये. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयारी सुरू करण्यात आलीये. मात्र दुसरीकडे राज्यसभेच्या ६ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी छत्रपती शाहूमहाराजांच्या नावाचा विचार सुरू आहे, मविआच्या नेत्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी विचार सुरू असताना दुसरीकडे २ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीराजे नॉट रिचेबल आहेत. तर छत्रपती संभाजीराजेंनी आपले सर्व कार्यक्रम देखील रद्द केलेत. त्यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय.