जागा वाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’चं ठरल्यानंतर ‘वंचित’चा निर्णय, ‘या’ तारखेला पुन्हा बैठक
मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली
मुंबई, ६ मार्च २०२४ : मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये महाविकास आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ९ तारखेला पुन्हा महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास १७ जागांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काही जागांवर अदलाबदली करावी, अशी भूमिका यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मांडली असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या कोण किती जागा लढवणार यासंदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्च रोजी होणार आहे.