‘वंचित’वरून लोकसभेचं जागावाटप अडलं, वंचित ‘मविआ’साठी किती महत्वाची? प्लॅन नेमका काय?
मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभेच्या ४८ जागांवर मविआसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र चार तास सुरू असलेल्या बैठकीतून महाविकास आघाडीने अंतिम फॉर्म्युला जाहीर केलाच नाही
मुंबई, ७ मार्च २०२४ : महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिलाही सुरू आहे. मुंबईत तब्बल चार तास मविआच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र अपेक्षा असतानाही जागा वाटप काही झालं नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा तोडगा काही निघालाच नाही. मुंबईच्या हॉटेल फोर सिझन्समध्ये महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभेच्या ४८ जागांवर मविआसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र चार तास सुरू असलेल्या बैठकीतून महाविकास आघाडीने अंतिम फॉर्म्युला जाहीर केलाच नाही. मात्र मविआच्या दोन फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही ९ मराठीला मिळाली आहे. मविआच्या पहिल्या फॉर्म्युल्यानुसार वंचित सोबत न आल्यास शिवसेना २३, काँग्रेस १५ आणि शरद पवार गट १० जागा मिळू शकतात. हा फॉर्म्युला मविआच्या तीन प्रमुख पक्षांचा आहे. जर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आघाडी सोबत आलीच तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेना २०, काँग्रेस १५ आणि शरद पवार गट १० जागा आणि वंचितला ३ जागा मिळू शकतात. बघा यासंदर्भातील