'अजित दादा महायुतीतून बाहेर पडले तरच...', शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

‘अजित दादा महायुतीतून बाहेर पडले तरच…’, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 11, 2024 | 8:38 PM

महायुतीच्या नेत्यांकडून ‘एक है तो सेफ है’ ‘बटेंगे तो कटेंगेच्या’ मुद्द्यावर जोर देण्यात येत असताना अजित पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. ते लातूर जिल्ह्यातल्या चाकुर इथ बोलत होते.‘एक है तो सेफ है या विधानाला आता अजित पवार विरोध करत आहेत, याला काही अर्थ नाही. त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, त्यांच्या सोबत रहायचे, सत्तेत राहायचं आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे ठीक नाही, अशी थेट प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी सभा घेतली त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे. ते पुढे असेही म्हणाले. आज अजित पवार हे भाजपसोबत गेलेत. त्यांना भाजपला सुनावण्याचा काही अधिकार नाही. काही घटकांचे मतं मिळावी, हे मतांसाठी सुरू असल्याचे म्हणत दादा विरोधासाठी विरोध करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Published on: Nov 11, 2024 08:38 PM